Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

आज शिवाजी महाराज असते तर

आज शिवाजी महाराज असते तर

3 mins
306


आज शिवाजी महाराज असते तर..आता हा कल्पनाविलास असल्यामुळे त्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही अंगाने पाहता येते.

आणि प्रथम पाहूया या विषयाची (निगेटिव्ह) नकारात्मक बाजू.


अहो जरी आज शिवाजी महाराज असते, तरी इथल्या लाच खोर भ्रष्ट राजकारण्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, किंवा प्रशासकीय फळीने, महाराजांना सुद्धा जेरीला आणले असते.

किंवा अशा लोकांपुढे महाराज सुद्धा हतबुद्ध झाले असते, त्यांनी हात टेकले असते.असे मला वाटते.


अहो पूर्वी एकच अफजल होता, आणि तो उघड शत्रू होता.

परंतु आता असे कित्येक अफजल आजूबाजूला आहेत, आणि ते अस्तनीतले निखारे आहेत.ते छुपे शत्रू आहेत त्यामुळे अशाच छुप्या शत्रूचा पाडाव करता करता महाराज सुद्धा घाईला आले असते.

तेव्हा एखादा गड स्वराज्यात पाहिजे म्हटल्याबरोबर, प्राणाची बाजी लावणारे मावळे होते..

प्राणाची आहुती देऊन असे गड त्यांनी जिंकले.


पण आता विचार करु! मिटिंग भरवू समिती नेमू,  आज्ञापत्र काढू,मग ते या टेबलावरून त्या टेबलावर फिरेल ,आणि शेवटी कधीतरी दहा-पंधरा वर्षांनी तो गड जिंकण्याची लढाई करण्याची आज्ञा होईल.


किंवा असाही निर्णय होईल की तो गड स्वराज्यात काही कामाचा नाही, त्याच्यावरती संपत्ती उत्पन्न करण्यासारखे काही नाही, परिणामी तो जिंकण्याची आवश्यकता नाही, असे देखील होऊ शकते .


तेव्हा महाराज राजे झाले म्हणून एकाही मावळ्याने फक्त तुम्हीच का राजे होणार? "आम्ही पण लढाई लढलो आहे"

 आहे आम्ही पण काम केले आहे, आम्ही पण आमच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले, आम्ही पण हालअपेष्टा काढल्या, मग श्रेय तुम्ही एकटे का घेणार? 

असे कोणाच्या मनात देखील आले नसेल, उलट प्रत्येक मराठी छाती त्यावेळी अभिमानाने भरून गेली.

पण मंडळी आता काय होईल-----? सुज्ञास सांगणे न लगे.

तुझी खुर्ची खाली कधी होते आणि मी त्यात कधी बसतो अशी आता प्रवृत्ती आहे.

त्यामुळे आता शिवाजी महाराज असते तरी, मला वाटत नाही काही फरक पडला असता .


आता आपण याच विषयाची (पॉझिटिव्ह) सकारात्मक बाजू पाहू या! 


जर आता शिवाजी महाराज असते तर? 

कदाचित खूपच फरक पडला असता.

कारण ज्या काळात मोबाईल सारखी यंत्रणा नव्हती , त्या काळात देखील महाराजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेरांचे जाळे अतिशय सुदृढ अवस्थेत होते.

या टोकापासून त्या टोकाला रातोरात खबरा जात असत. घळीतून, दरीतून, वेशांतर करून कोणी साधू संन्यासी,,कोणी गोंधळी, कोणी माकड वाला, कोणी डोंबारी ,कोणी अस्वल वाला, अशा नाना प्रकारचे हेर आणि हेरांचे जनक बहिर्जी नाईक त्या काळात होते. 

आज देखील शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून कसे निसटले? आणि कोणत्या मार्गाने महाराष्ट्रात परत आले ,याचा प्रत्यक्ष पुरावा कोठे नाही.

किंवा कोणालाही ते माहीत नाही.असा कोणता मार्ग होता? 


शाहिस्तेखानाची बोटे कापली, तेव्हा तर शत्रूच्या समुद्रात आत शिरून, आपला एकही मावळा न गमावता ,सुरक्षित बाहेर येणे हे काही येरागबाळ्याचं काम नाही.

शिवाय शत्रुची दिशाभुल करण्यासाठी बैलांच्या शिंगांना पेटत्या मशाली बांधून, त्यांना दुसऱ्या बाजूला पळवणे .आणि आपण विरुद्ध दिशेने जाणे की गोष्ट, 

 पन्हाळगडाच्या सुटकेच्या वेळी आपल्या सारखा हुबेहूब माणूस वेषांतर करून पाठवणे .

ह्या सगळ्या क्लुप्त्या ज्या काळात काही तंत्रज्ञान नव्हते तेव्हा वापरल्या.

मग आता तर मला वाटतं महाराजांनी अर्ध्या पाकिस्तानात मावळे पेरले असते.


महाराजांचे कोणतेही स्वारी कोणतीही लढाई फसली नाही.

म्हणजे इतके उत्तम नियोजन त्यांच्याकडे होते.पूर्वतयारी अतिशय उत्तम केलेली असे, 

त्यामुळे आत्ताच्या आर्थिक तरतुदी, संरक्षण विषयक तरतुदी, लढाईसाठी सतत तयार राहणे, या गोष्टी महाराजांनी केल्या असत्या.


 आताच्या तर तंत्रज्ञानाचा महाराजांनी नक्कीच उपयोग करून घेतला असता.आणि संदेशवहनातले " की होल्स महाराजांनी बरोबर शोधून काढले असते.

अचानक होणारे बॉम्बस्फोट, कारगिल सारख्या गोष्टी जिथे पाकिस्तानने अचानक पणे कब्जा केला आणि आपल्याला कळले देखील नाही, या गोष्टी कदाचित महाराजांच्या काळात मुळीच घडल्या नसत्या.


कारण त्यांनी आधीचआपले हे सगळे जाळे अद्यावत ठेवले असते.

महाराजांची सैनिकांना पाठवलेले आज्ञापत्रे वाचली असता, त्यामध्ये रयतेच्या एक तन सडीला देखील धक्का लागू नये ,असे त्या पत्रात लिहिले होते.

मावळ्यांनी शेतातले धान्य जबरदस्ती घेऊ नये, रीतसर शेतकऱ्याला त्याचा पैसा द्यावा.

रात्रीच्या वेळी दिवा मालवून झोपावे, उंदराने वात चोरली तर अग्नी लागण्याचा संभव आहे.आणि त्यामध्ये सर्व काही जळून खाक होईल असा इशारा महाराज त्या काळात देत होते तर, आताच्या काळात तर लांडीलबाडी हप्ते बाजी हे प्रकार नक्कीच बंद केले असते.

आता कोणतीही फाईल नोटां शिवाय सरकत नाही , असे आता महाराज असते तर झाले नसते .


आता एक आयोध्येचा प्रश्न भिजत पडला होता, असे प्रश्न महाराजांनी भिजत ठेवले नसते.तर त्यांनी काशी मथुरे सहित सर्वच मंदिरांचा जीर्णोद्धार केला असता.

कारण महाराजांना सर्व धर्म समान होते हे बरोबर! 

म्हणून काही त्यांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या त्या ठिकाणी समान भाव दाखवला नसता.कारण तेथे मुळात मंदिरेच होती.


हा !आता कोणाची मशीद पण त्यांनी पाडू दिली नसती.

या भारतभूचे असंख्य तुकडे झाले नसते, 

लोक जाती-धर्मात विभागले गेले नसते.

कारण असं एखादं काहीतरी "लक्ष्य " लागतं जिथे सारी माणसे एकत्र येतात.

 कोणीतरी नेता लागतो, प्रमुख लागतो ,तो तुम्हाला एखादे स्वप्न देऊन, एकत्र आणू शकतो .

आणि ते काम महाराजांनी नक्कीच केले असते


Rate this content
Log in