Anil Kulkarni

Others

3  

Anil Kulkarni

Others

आज फिर जिने की तमन्ना है..

आज फिर जिने की तमन्ना है..

6 mins
256


आज फिर जिने की तमन्ना है.. 

जीवन जगण्यासाठी जीवन अनलॉक करता आले पाहिजे. आपल्या मनालाहीअनलॉक करता आले पाहिजे आपल्या मनात अनेक कप्पे असतात काही कायमचे बंद, पण कोणताच कप्पा बंद करू नये. टप्प्याटप्प्याने माणूस जीवन जगत असतो. एखादा कप्पा बंद केल्यावर मार्गच खुंटतो.आज रिमझिम पावसा च्या सरीमध्ये मुक्तपणे भिजायच आहे, पण ढगफुटी ही होणार आहे अशी परिस्थिती जीवन जगताना येते.

स्वप्नातील कळ्या अजून उमलायच्या आहेत, चाफा अजून बोलला कुठे? जीवनात ही घडी अशीच राहू दे, असे क्षण अजून कुठे आले? Miles to go before I sleep अजून बाकी आहे.

मैफिली अजून रंगायच्याच आहेत.

 श्रावण अजून यायचा आह. पृथ्वीने हिरवा शालू नेसलेला पाहायचा आहे. कोकीळेचं गुंजन ऐकायचा आहे, मोराचा थुई थुई नाच पाहायचा आहे. मनातली स्पंदन अनुभवायची आहेत.मनातलं म्हणून त्याचे अर्थ शोधायचं आहेत. खूप खूप काही करायचं आहे. निसर्गातल्या दवबिंदू सारखा दृष्टी आनंद मित्रांना द्यायचा आहे. आत्ताच कुठे मरणासन्न मृत्यूची आर्जवे आमच्यासमोर कशाला हवीत.दु:ख तर पाचवीलाच पुजलेलं आहे,तरीप्रत्येकाला जगायची इच्छा असतेच. प्रत्येकाचे आराखडे ठरलेले असतात, तसेच प्रत्येकाची आकडेही ठरलेले असतात.

वेदनेचा अविष्कार सुध्दां सुंदर जगुन, आनंदात परावर्तित करायचा असतो. काही गोष्टी आपल्या होऊ शकत नाही पण आपण तर त्यांचे होऊ शकतो ना. आवाक्या बाहेरच्या गोष्टीवर प्रेम बसतं तेव्हा आपल्याला प्रेम करायला कुणी रोखू शकत नाही. सौंदर्य हे प्रेमासाठी असतं, आस्वादासाठी असतं. सौंदर्याचे हजारो उपासक असतात. देवाचेही हजारो उपासक असतात. देवाने आपल्या कडे लक्ष नाही दिलं, देव मंदिरातून अदृश्य झाला, देऊळे बंद झाली तरी आपलं देवाविषयी प्रेम असतंच आणि त्याला कोणी रोखू शकत नाही. प्रेम करणारा माणूस मिळाले की आयुष्याला कलाटणी मिळते, जगावसं वाटू लागतं.

आपण प्रत्येक जण रियालिटी शोच्या ऑडिशनसाठी आलेले असतो. कधी एलिमिनेशन होईल सांगता येत नाही पण वाइल्ड कार्ड ने पुन्हा एन्ट्री कधी कधी मिळते, तसच आयुष्यात काही माणसे भेटल्यानंतर पुन्हा काही काळ आपण आपल्याला सिद्ध करू शकतो, ही उमेद जगण्याला कारणीभूत ठरते.जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो पण कसं जगायचं हे आपल्या हातात असतं, असं म्हणणारा नायकच जेव्हा जगाला रामराम करतो तेव्हा त्याचं ते म्हणणं अभिनय होता कां? तो अभिनय जगत होता का जिवन जगत होता हा प्रश्न पडतो. खोटे आणि छोटे-छोटे अभिनय करतच माणसे जगतात. माणसे दिसतात तशी नसतात. तत्त्वज्ञान सांगण वेगळं आणि जगणं वेगळं. माणसे केवळ औषधावर जगत नाहीत. प्रेमावर व प्रेरणेवर जगतअसतात.

प्रत्येकालाच मृत्यूच्या भोज्ज्याला शिवूून येता येतं नाही. वेदना जगलेला माणूस मृत्यू जगलेलाच असतो.प्रत्येक वेदनेतून फिनिक्स पक्षी उभारी घेत नाही.

मृत्यू अटळ आहे हे समजल्यावर राहिलेला संकल्प पूर्ण करणे, आनंद जगुन घेणे एवढेच आपल्या हातात असतं. प्रत्येकाची आशा वेगळी. निराशा वेगळी. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारे त्यावेळी त्या क्षणापुरते सुखीच असतात.दुःखाला आनंदात बुचकळायला हवं.

काही माणसें असली काय आणि नसली काय त्यांच जाणं आणि अभिनय चटकाच लावतं.

वेदना जेव्हा प्रेमाला हात घालते तेव्हा ती सुगंधी जखम करून जाते.

आपणही आपल्या आयुष्याच्या पुढचं काय वाढून ठेवलंय हे पाहण्यासाठी कळत नकळत प्रस्थानच करतो.

जीवन संपत चाललं कि जास्त जगण्याची इच्छा निर्माण होते. राहिलेल्या इच्छा, आकांक्षा,

 बकेट लिस्ट पूर्ण करायची असते.

आज कुणीतरी यावे प्रमाणे, कुणीतरी येते, तिच्याशी आपली तार जुळते आणि मग जगण्याच्या आशा पल्लवीत होतात.

आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे पण मृत्यूच्या करारपत्रावर आम्ही स्वाक्षऱ्या कधीच केलेल्या आहेत, याचीही अधून मधून जाणीव होते.

अफवा या आयुष्य उध्वस्त करणाऱ्या असतात,मध्ये मध्ये स्कायलाब कोसळणार, ग्रह कोसळणार जगबुडी होणार, अशा बातम्यांनी व या सगळ्या खऱ्या ठरेपर्यंत अफवाच असतात आणि अफवा आयुष्य उद्ध्वस्त करतात.

मृत्यूचं करारपत्र सेफ डिपॉझिट मध्ये टाकून किल्ली समुद्रात फेकून द्यायची, तरच जीवनाचा आनंद घेता येईल. दोन श्वासातला अंतर प्रत्येकाचे वेगळे आहे,

 त्याचा जास्त विचार नाही करायचा. पुढचा क्षण आपला नसतोच, पण तो जेंव्हा येतो तेव्हा तो आपलाच असतो. जाणीव आहे तोपर्यंत आयुष्य आहे. झोपेत आणि मृत्यू झाल्यावर जाणीव जाते. झोपेत स्वप्न खरी,खोटी असतात. स्वप्नांचा रिमेक पाहता येतो तसे मृत्यूनंतर नाही. मृत्यूनंतर चा रिमेक पाहता येत नाही. उपभोग संपत नाहीत म्हणूनच भोग आहेत.

 आपल्यावर कुणीतरी जीव लावतं, प्रेम उधळतं, आपल्यासाठी काहीही करायला तयार होतं, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा या जीवनावर या मनावर शतशः प्रेम करावं वाटतं व मृत्यू नकोच असं वाटत.

 माणसाला सुखद क्षण कधी संपुच नयेत असं वाटतं.

प्रत्येकाला शेवटच्या क्षणापर्यंत जगायचा आहे. काही जण ते क्षण आपण होऊन संपवतात. आयुष्य संपवणाऱ्यांनी त्यांचे मन थोडं दुसरीकडे जर गुंतवलं, मन विचलित केलं व आशादायक परिस्थितीत माणसात जर ते वावरले तर त्यांचं मतपरिवर्तन नक्की होऊ शकेल, पण तसं होत नाही,ठिकाणी मन दुबळं पडतं आणि शरीर हावी होतं आणि स्वतःहून आत्माहूती पथकातल्या व्यक्तीप्रमाणे ते आपलं जीवन संपवून टाकतात.

 उद्याचा दिवस आपला असू शकतो. उद्याच्या दिवस आपण सत्ता गाजवू शकतो. अनेक जण स्वतःचा जीव संपवता संपवता लहानग्या चिमुरड्यांना ही त्यात सामील करून घेतात. त्यांनी जग पाहिलेलं नसतं,त्यांचे उद्या चांगले होऊ शकतं,त्यांचा सांभाळ कोणीतरी करू शकतं व त्यांच्या कौशल्यावर ते आयुष्यात चांगलं जीवन जगू शकतात पण त्यांचे जीवन संपवण्याचा अधिकार आत्महत्या करणाऱ्यांना कोणी दिला.

अनेकांनी आपल्या मृत्यूची लाईव्ह कॉमेंट्री केली आहे. सरदाना व डॉ.के.के अग्रवाल यांचे शेवटचे व्हिडिओ जर पाहिले तर डोळ्यातून अश्रू येतील. आम्ही नसलो तरी शो मस्ट गो ऑन हे त्यांनी सांगितलं. आपल्या मृत्यूचा प्रत्येक क्षणाचा अहवाल ते देत होते. ते स्वतः आपल्या मृत्यूचं न्यूज बुलेटीन देत होते.

 करोना च्या काळातही जगायच आहे प्रत्येकाला, विलगीकरणात कां असेना, अंतर राखून का असेना, मुखवटे धारण करून का असेना, औषधांचा भडिमर सहन करून का असेना पण प्रत्येकाला जगायचं आहे. आपण सगळे भाड्याच्या घरात राहतो, करार संपला की घर सोडावं लागतं तसं करार संपला की शरीर नावाचं घर सोडांवच लागंत. विशिष्ट परिस्थितीत मन कितीही श्रीमंत असलं तरीही शरीराने करार केलेला असतो तो पाळावाच लागतो. शरीराच्या व्याधींचे ऐकावं लागतं, त्यानुसार वागावं लागतं. शरीराने हे राम म्हणले की मनालाही या जगाचा निरोप घ्यावा लागतो. गेलेल्या बद्दल आपल्याला सहानुभूती वाटते. त्याने जायला नको होतं अजून तो खूप काही करू शकला असता, पण आपण गेल्यावर सुद्धा लोक हाच विचार करतील याची जाणीव मनाला स्पर्शून जाते.पण हे सगळे नकारात्मक विचार मनात आणत बसलो तर रोजचा दिवस ढकलणे मुश्कील होईल, म्हणून नकारात्मक तेची पाने सोडून आयुष्यातल्या सकारात्मक तेची पाने वाचायची. आयुष्य हे कादंबरी प्रमाणे आहे. रटाळ वर्णन असेल दुर्बोध वर्णन असेल तर ती पाने उलटून पुढे जायचं आणि हव्या त्या पानावर नजर स्थिर करायची. प्रत्येक पुस्तक आपण संपूर्ण वाचु असं नाही, काही जण शेवटचा भाग वाचतात, काहीजण सुरुवातीचा भाग वाचतात, काहीजण मधला भाग वाचतात काहीजण सवडीनुसार जिथे नजर खिळेल तेथे , जिथे अर्थ गवसेल, मनाला शांती मिळेल, जिथे हास्याची लकेर उमटेल तिथे थांबतात,म्हणजे वाचन सुसह्य होतं आणि शेवटी वाचन हा आनंद देणारा प्रकार आहे. आयुष्याच्या पुस्तकाचं वाचन हे असंच आहे. नकोसा भाग सोडून द्यायचा आणि पुढे जायचं तरच आयुष्याची कादंबरी आवडायला लागेल, नाहीतर ती हातावेगळी करावी लागते. संदर्भ शोधून काहीचे अर्थ लागत नाहीत, आयुष्याचंही असच आहे काही गोष्टी तर्काच्या पलीकडे आहेत पण तरीही म्हणून त्या स्वीकारणं हे आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. अनेक अतार्किक गोष्टी घडतात पण त्याच्यावर विश्वास ठेवत असताना अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं नाही. तुम्ही सुंदर उंच घर बांधलं प्रशस्त घर बांधलं पण राहता येणार नसेल तर त्याला काय अर्थ आहे. घरासमोर चार चार गाड्या आहेत पण तुम्ही गाडीतून फिरणारं असाल तर त्या जीवनाला अर्थ काय आहे. म्हणजेच वैभव बघण्याला सुद्धा उपभोगण्याला सुद्धा वेळ हवा,संधी हवी सगळं आहे पण काहीच करता येत नाही, पैसे आहेत पण खर्च करता येत नाहीत. सगळे फिक्स डिपॉझिट मध्ये बँकेत मृतावस्थेत पडून आहेत. माणसे सध्या कसला आनंद घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. मृत्यू दारातच बसलेला आहे, तरीही आपण आपलं जगणं सोडायचं नाही, आपल्या आशा सोडायची नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आपण स्वतःला, मनाला रमवायचं.

श्रावण येणारच आहे, इंद्रधनुष्य दिसणारच आहे, या आशेवरच जगायचे आहे.

जगण्यात अर्थ शोधायचा असतो. सगळेच अर्थ शब्दकोशात नसतात, काही अर्थ शब्दांच्या पलीकडे असतात, ते जगता यायला हवेत,


Rate this content
Log in