Jyoti gosavi

Others


4.5  

Jyoti gosavi

Others


आईची छाया

आईची छाया

2 mins 850 2 mins 850

माझ्या चंदनी खोडाचा 

मंत्र झिजणे झिजणे

उणे लिंपायला माझे

 घाली सुगंधचे लेणे

झिज केशरी तयाची

तप्त जीवा लावी उटी 

आत उमले भावना शांत शीतल गोष्टी

माझे सुख माझे तृप्ती हीच देवपूजा त्याची आणि झिजणे झिजणे

इच्छा एक झिजायची


खरेतर आपण जन्माच्या आधीपासूनच आईच्या छायेत वावरत असतो तिच्या चालण्याच्या लयीत आपण हिंदोळे घेतो

तिच्या हृदयाची धडकन ऐकत आपले नऊ महिने जातात ती रडली तर आपण दुःखी होतो. ती हसली तर आपण आनंदी होतो. ती जेवली तर आपण जेवतो, ती उपाशी तर आपण उपाशी राहतो असा जन्माच्या आधीपासूनच आईच्या छाये तला प्रवास सुरू होतो.

पुढे जन्म घेतल्यावर पहिला चेहरा आईचाच दिसतो. आपण पहिला शब्द आई हाच बोलतो. तिचा हात धरून आपण चालायला शिकतो. इथे हात नको लावू, भाजेल इथे नको चढू पडशील. असे छोटे छोटे अनुभव आपल्याला आईमुळे मिळतात आपल्याला चांगले वाईट रितीरिवाज चांगले संस्कार आईज देते जन्मापासून मरेपर्यंत तिच्या विचारांचा पगडा आपल्यावर ती असतो त्यामुळे आपला पहिला गुरु आईच असते.  

आपण म्हणतो माझी आई ना असं म्हणायची,माझी आई ना तसं करायची पण माझे बाबा असं म्हणायचे असं कोणी म्हणतं म्हटलेले ऐकले का किंवा ऐकलं असेल तरी ते कमी प्रमाणात आई मुलांना गोष्टी सांगते मुलांचा अभ्यास घेते आई मुलांच्या आजारपणात त्यांची करते. तुमच्या चुकांवर पांघरुण घालते. आई आपल्या लेकरांसाठी सर्वस्व पणाला लावते बायको मेली तर पुरुष कापड दुसरे लग्न करतो पण जर नवरा मेला तर मोलमजुरी करून आपली कच्चीबच्ची जगवते पण ती त्यांना वाऱ्यावर सोडत नाही .वट वृक्षांची घनदाट छाया आणि आईची कधीच न पातळ होणारी माया हा अनमोल ठेवा आहे.तुमच्या

 जन्मापासून ते तिच्या मरणा पर्यंत ती तुमच्यावर छायाच धरते.

 तिचे बोलणे, तीचे चालणे, तिची लकब, हे सारे घेतच आपण लहानाचे मोठे होतो आणि तिची प्रतिकृती बनतो

कधीतरी एक दिवस ती छाया आपल्यापासून खूप दूर जाते आणि जेव्हा उन्हाचे चटके बसतात तेव्हा त्या छायेची किंमत आपल्याला कळते


Rate this content
Log in