“
जीवन
रम्य बालपणात आपण खेळतो , बागडतो
सुखदूःखांच्या ऊनसावल्या घेत
तारुण्याचा घाट उतरतो
मध्यमवयात कर्तृत्वाच्या बहरात
यशाची शिखरे गाठतो
प्रौढवयात सांजसावल्या दिसताच
थोडासा थबकतो
पैलतीर खुणावताच
नातेसंबंधात हळूवार होतो
ह्यालाच जीवन ऐसे नाव
सौ मनीषा आवेकर
”