“
जीवन
रम्य बालपणात आपण खेळतो , बागडतो
सुखदुःखांच्या ऊनसावल्या घेत
तारुण्याचा घाट उतरतो
मध्यमवयात कर्तृत्वाच्या सावलीत
थोडासा विसावतो
सांजसावल्या दिसू लागताच
भावनाशील होतो
पैलतीर खुणावताच
नातेसंबंधात हळूवार होतो
ह्यालाच जीवन ऐसे नाव!!
सौ मनीषा आवेकर
”