Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Seema Gandhi

Others

5.0  

Seema Gandhi

Others

येईल ग सखे श्रावण...

येईल ग सखे श्रावण...

1 min
305


येईल ग सखे श्रावण...

सोडण्या ढगांचे मौन...

इंद्रधनुशी कमान...

हळूच हसेल ढगांआडून...


भिरभिरतील... रंग ओले

मोहरतील... गंध सारे

हळूच येतील सरसरणारे शिरवे...

सरींचा घुंगुरवाळा रुणझुणेल गं...

येईल ग सखे श्रावण... येईल गं...

सोडण्या ढगांचे मौन...


चिंब फुलेल उद्याची पहाट...

भिजलेल्या पंखांचे होईल सुरेल गाणे...

आता सांभाळील श्रावण

आषाढाचे हे देणे...

अवनीवर फुलेल चैतन्याचे लेणे...

येईल ग सखे श्रावण... येईल गं...

सोडण्या ढगांचे मौन...

येईल ग सखे श्रावण... येईल गं...


Rate this content
Log in