ये हळव्या मना...
ये हळव्या मना...
1 min
269
ये हळव्या मना
ताठर ठेव तुझा कणा
किती हळवा आहेस रे तू
संकट येताच घाबरतोस रे तू
ये हळव्या मना
किती अस्वस्थ असतो
एका सेकंदात तर तू
अंतराळात पोहोचतो
ये हळव्या मना
ठेव भविष्याची आस
येणारा प्रत्येक दिवस
असेल तुझ्यासाठी खास
ये हळव्या मना
काढू नको कोणाच्या आठवणी
कुजबजलेल्या आठवणींची
मनात होईल साठवणी
ये हळव्या मना
असं रडायचं नसतं रे
मुठीमध्ये बळ ठेवून
आनंदाने जगायचं असतं रे
