STORYMIRROR

Shrutika Mahajan

Others

3  

Shrutika Mahajan

Others

शब्दांचा आधार

शब्दांचा आधार

1 min
266

नको कोणाची सहानुभूती 

नको कोणाचा आधार 


नको कोणाचे आयुष्यभर 

न फिटणारे उपकार 


आधार तरी काय हो 

वरवरचाच असतो 


खोलवर असलेल्या 

दुुःखाचे थोडीच अश्रू पुसतो 


आम्ही आहोत ना!

हा असतोच शब्दांचा आधार 


एखाद्यावर आलेल्या परिस्थितीचा 

कोणी करत नाही विचार


आयुष्य म्हणजे परीक्षाच असते स्वतःची 

वेदनादायी वेळ असतेच ती नियतीची 


कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी 

    आहे मी खंबीर 


माझ्या आयुष्याच्या जगण्याला 

   होऊ देत की उशीर 


Rate this content
Log in