ब्रम्हणस्पती
ब्रम्हणस्पती
1 min
289
तूच आहेस गणराज
तुला आवडतो दुर्वांचा साज
तुला आवडतो मोदकाचा नैवेद्य
तुच आहेस विश्वाद्य
तुच आराध्यदैवता
तुच या विश्वाचा कर्ता
तुच आहेस विद्यादाता
तुच चरांचरांत सर्वथा
तुच आहेस महागणपती
तुझ्यापासूनच मिळते स्फुर्ती
तुझं नाव आहे श्रीं
तुला त्रिवार वंदन करते मी
