STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

4  

VINAYAK PATIL

Others

व्यसनमुक्ती

व्यसनमुक्ती

1 min
236

नकोस करू खराब 

आयुष्य असे मोलाचे 

होऊनी व्यसनाधीन 

दिवस आणे दुःखाचे ||१|| 


अनेक घरे उठली 

लेकरं झाली पोरकी 

ओसाड पडले सारे 

काहीच न‌ उरे बाकी ||२|| 


सोडूनी व्यसना ध्यास 

शिक्षण आपण घेऊ 

होईल असा उद्धार 

व्यसन मुक्तच‌ होऊ ||३|| 


कित्येक जणांचे जीव 

शापित होण्या वाचवू 

एकत्र येऊनी चला

व्यसन मुक्तच होऊ ||४|| 


Rate this content
Log in