व्यसन मुक्ती दिन
व्यसन मुक्ती दिन
1 min
399
व्यसनाधीन माणूस होतो.
मजा मस्तीच्या जोशात
पण व्यसनमुक्त होणे हे
मात्र नसे त्याच्या कोशात.
असावे व्यसन माणसांना
पण प्रमाण त्याचे ठरलेले
बरे वाईट शेवटी ते व्यसनच
अति तेथे माती असलेले.
खेळ, अभ्यास,वाचन,लेखन
असतील अशी अनेक व्यसने
दारू,सिगरेट,चहा कॉफी भटकंती
ही व्यसने धोक्याची असणे.
पुन्हा पुन्ह तेच करणे म्हणजे
व्यसनाच्या आहारी जाणे
त्यातुनी मग मुक्त होणे हे
फार कठीण होऊनी बसणे.
व्यसनापासुनी मुक्त होणे
हाती सर्वश्री व्यसनाधीनाच्या
ठाम मनी केला जर निच्छय
तरच त्याच्या हाती स्वतःच्या.
