STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

वसंत फुलला

वसंत फुलला

1 min
385

प्रितीचा मनी वसंत फुल़ला

रोम रोमात मम आनंद भरला

हर्ष मनिचा मी सांगू कुणाला

जीव माझा मोहरून गेला....१


भ्रमरा भाती जीव जडला

रंग ही त्याचा मनात भरला

मध रस घ्याया आतूर झाला

प्रितीचा मनी वसंत फुलला....२


एकमेव हा मनात ठसला

नाही कुणी दुसरा दिसला

बघता क्षणी डोळ्यांत भरला

प्रितीचा मनी वसंत फुलला....३


नशीबवान मी समजले मजला

अमोल रत्न हे सापडले मला

जतन करीन मौल्यवान रत्नाला

प्रितीचा मनी वसंत फुलला.....४


भूतलावर जणू स्वर्ग अवतरला

नाहीच कशाची उणीव मजला

जीव माझा अति आनंदला

प्रितीचा मनी वसंत फुलला....५


Rate this content
Log in