STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

वर्ष सरता

वर्ष सरता

1 min
11.8K

सुख दुःखाच्या क्षणाचे साल सरलं सरलं.

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं।।ध्रुव।।


आठवणीची शिदोरी ओली चिंब जाहली.

खोटं नात्याचा ऋणानुबंध

झुलत राहिलं.

जखमावरती मीठ चोळत हासत ते गेलं.

सुख दुःखाच्या क्षणाचे साल सरलं सरलं.

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं....।।१।।


प्रेमळ जिव्हाळा जपणारी नाती हिरावून नेलं.

भष्ष्ट्राचाऱांने लाटलेल घर हिम्मतीन बांधलं.

अन्याय, बलात्काराने कान विटलं विटलं.

सुख दुःखाच्या क्षणाचे साल सरलं सरलं.

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं...।।२।।


खाऊन मेवा गणगोत ओळख विसरलं.

कवितेत रमून काव्यरत्न मी जिंकल.

हव्यासापाई माणूस महापूरात वाहिलं.

सुख दुःखाच्या क्षणाचे साल सरलं सरलं.

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं...।।३।।


जीवास हा घोर राजकारण्यांचा खेळ.

साध्या माणसाच जगणं बेहाल जाहलं.

वर्ष सरताना त्यांने कितीते नेलं,दिधलं.

सुख दुःखाच्या क्षणाचे साल सरलं सरलं.

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं...।।४।।


नविन वर्षाचा संकल्प पाहू माणसात देव.

जातीभेद विसरून माणुसकीस जपेलं.

देशाच्या हिता भक्तीभावात रंगेलं.

सुख दुःखाच्या क्षणाचे साल सरलं सरलं.

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं...।।५।।      


Rate this content
Log in