वृक्ष
वृक्ष
1 min
7
होते बसले उपवनी
विसावण्या आले पक्षी
झुलले वृक्ष फांदीवरी
उडता दिसली नभात नक्षी
बहरलेले हरित पर्णांनी
वृक्ष होती बहरदार
पक्षी, किटकांना देत निवारा
झाडे होती डौलदार
साहूनी उष्ण झळा
पशुंना देतसे छाया
पथिकास देई गारवा
जणू करी प्रेमळ माया
वृक्ष असे सत् पुरुषा सम
देई फळ फुल छाया
जरी करिता तया आघात
करी सदैव प्रेमाची माया
थांबवी मातीची धूप
मदत रूप पावसास
फुला फळांनी बहरूनी
आनंददायी देते मनास
