वंदन त्रिवार राज्याला
वंदन त्रिवार राज्याला
सलाम माझ्या राज्याला
अभिमान वाटतो प्रजेला
हतात भगवा हा दिला
जंगलात वाघ हा खुला
रक्तात भाव सळसळला
वंदन त्रिवार राज्याला
द-याखो-यात गड बांधिला
नाही दिवस रात्र पाहिला
वादळागत राजा चालला
संकटांना नाही घाबरला
मांवळ्यांना ध्यास ज्यांनी दिला
वंदन त्रिवार राज्याला
उभे फाडले अफजलखानाला
तुंडा केले शाहिस्तेखानाला
एक दोन नाही सांगायाला
कथा आहेत अनेक ऐकायाला
रोमा रोमात जोश ज्यानी भरला
वंदन त्रिवार राज्याला
जना जनांनी गुणगान केला
अंखड महाराष्ट्र घडवला
मंत्र हा स्वराज्याचा दिला
केले स्वातंत्र सर्व रयेतेला
सलाम महाराजांच्या किर्तीला
वंदन त्रिवार राज्याला
वंदन त्रिवार राज्याला
वंदन त्रिवार राज्याला
