वंदन देशसेवकांना
वंदन देशसेवकांना
वंदन देश सेवकांना करू
जे लढती आज देश रक्षणार्थ
कोरोनाचा धुमाकूळ साऱ्या जगात
आम्ही आपल्या घरात स्वयंरक्षणार्थ.
धुवा हात पुन्हा पुन्हा साबणाने स्वच्छ
उगीच कामा शिवाय बाहेर जाणे टाळा
देशसेवकांचा बोझा हलका करण्या
राज्य सरकारचे नियम सारे पाळा.
डॉक्टर्स, सिस्टर्स दूर घरच्यांपासून
सतत तत्पर सेवाधर्म निभावण्यास
दिन रात्र झटती रोग्यास वाचवण्या
औषध नाही सापडले अजून कोरोनास.
घरी,दारी,गल्ली,रस्ते,अन् हॉस्पिटलांत
सफाई कर्मचारी ठेवती परिसर स्वच्छ
वंदन करते मी त्यांना, महान त्यांच्या
कार्यास, राबती ते स्वतः जेथे अस्वच्छ.
पोलीस, कनिष्ठ ते श्रेष्ठ अधिकारी
एकजुटीने कार्य करती भर रस्त्यावर उन्हात
रात्रंदिन देती खडा पहारा लोक कल्याणा
मान वंदना तयांस, ठेवून आदर मनात.
जरा विचार करा ह्या देश सेवकांचा जे
जीव धोक्यात घालुनी राबती अहोरात्र
डॉक्टर्स,सिस्टर्स,पोलीस दल अन् कर्मचारी
नमस्कार सर्वां, पाळुनी नियम एकमात्र.
