STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

वंदन भीमरावांना

वंदन भीमरावांना

1 min
224

वंदन वंदन वंदन

जय भीम वंदन...


तुम्ही सर्वांची शान,

आपणास त्रिवार वंदन...


करू किती गुणगान, 

तुम्ही आमचा अभिमान,

आपणास त्रिवार वंदन...


ठेऊन क्रांतिसुर्याचा मान

मिळवली शिक्षणाची खान

झेलली तुम्ही किती तुफान

आपणास त्रिवार वंदन...


पदव्यांचा मेरूपर्वत रचून 

समाज प्रबोधन घडवून

सर्वांना एकत्र घेऊन

आपणास त्रिवार वंदन...


काम केले महान

ही घटना रचून 

नाही गेले कधी खचून

आपणास त्रिवार वंदन...


सर्वांना एक सुत्रात बांधून

अभेद हे कायदे करून

सुरुंग अन्यायाला लावून

आपणास त्रिवार वंदन...


आज ही त्यांचेच वचन

मानून हे संविधान

वाढवितात आपली शान

आपणास त्रिवार वंदन...


हर्ष होतो भीमाचे कर्तृत्व पाहुन

खंत एवढीच आहे राहून राहून

जरी गेले ते आपल्यातून निघून

आपणास त्रिवार वंदन...


वंदन वंदन वंदन

हे भीमराव वंदन...


नाव घेताच वाढतात स्पंदन

आपणास त्रिवार वंदन...

आपणास त्रिवार वंदन...

आपणास त्रिवार वंदन...


Rate this content
Log in