STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

विठू माऊली

विठू माऊली

1 min
239

विठू माऊलीचे मुख

देहभानाचा विसर

तो परिसाचा स्पर्श

झाला मज हर्ष


विठू माऊलीचे रूप

डोळे भरुन पाहीन

धक्काबुक्कीच नाही भान

तोच नेई देवुनिया मान


पुंडलिकाच्या भेटी

विठ्ठल उभा विटेवरी

जनाबाईचे घरी

दळलेस दळण जात्यावरी


तुझ्या भजनाचा 

मज लागू दे छंद

तूच मायबाप

तूच रे सखा पांडुरंग


साहित्याला गुण द्या
लॉग इन