STORYMIRROR

Shreya Shelar

Others

3  

Shreya Shelar

Others

विसरायचेय तुला

विसरायचेय तुला

1 min
247

आभाळाएवढ्या तुझ्या आठवणी,

मन माझ इवलसं,

तरी करीत आहे आकांत,

कारण, विसरायचेय तुला!!


कधी होता सहवास तुझा,

आज आहे फक्त आभास तुझा,

नको मज कुठला ही ध्यास तुझा,

होय, विसरायचेय तुला!!


मंद झोका नाही,

एक वादळ होतास तू माझ्या जीवनी,

मोडायचच होत,

तर का गुम्फलास ह्या मनी,

नको आता कुठलाही भास ही तुझा,

कारण, विसरायचेय तुला!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन