विश्वास
विश्वास
अनेक तुझे रूप आहेत रे
अनेक तुझ्या जाती आहेत रे
पण न दिसणारा तु
माणसालाच माणसालाचे रंग दाखवणारा तु
या भुमीवर असा एकच आहेस तु
लवकर न कमवता येणारा तु
मात्र क्षणातच गमवला जाणारा तु
सगळ्यांच कार्यात तुझा मान
आहे पहिला रे
वाईट गोष्ट घडली की
तेथे सुद्धा पहिला मान
तुलाचं रे
विश्वास करायल हवा देवावर
अस सांगितल जात रे
कारण देवच आपल नशिब घडवतो असतो
असं म्हणतात रे
मी तर म्हणते रे
p>
अस पण घडवुन बघु की
आपणच आपल्यावर विश्वास ठेऊन
आपलं नशिब आपणंच घडवुन बघु की
असा कसा रे तु
अदृश्य रूपातच तुझी किमया दाखवणारा
देवा कडेही नवस करून
न भेटणारा तु
असा कसा रे तु
हजारो नात्यांना क्षणभरांतच
संपवुन टाकणारा तु
स्वतःलाच स्वतः पासुन
वेगळ करून दाखवणारा तु
भेटलाच तर
जगण्याची उमेद जागवणारा तु
नाही भेटलाच तर
जगण्याची इच्छा संपवणारा तु
जगण्याची इच्छा संपवणारा तु