STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

विरह

विरह

1 min
477

आज काय झाले मजला कळेना

स्वारी न बोले मज काही सुचेना


काय माझी चुक मला समजेना

मज बोलल्याविना चैन पडेना


तुझ्याविना मज मात्र राहवेना

सोड अबोला मज जवळ घेना


आस तुझ्या भेटीची मज मिळेना

तुला व्याकुळता माझी कां कळेना


माझी ही स्थिस्ती मलाच पाहवेना

दुःख काय माझे तुला सांगवेना


तुझ्याशिवाय क्षणही जगवेना

एक शब्द मला आज बोलवेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन