STORYMIRROR

vaishali vartak

Others

2  

vaishali vartak

Others

विद्याधन

विद्याधन

1 min
110

विद्या आहे जया पाशी

तोची ठरतो महान

करा विद्या संपादन 

मिळे तयाशी सन्मान


विद्याहीन माणसास

पशु सम देती मान

जाणा महत्त्व विद्येचे

जगी होण्यास महान


सर्व धनात ते श्रेष्ठ 

भय चोरीचे न असे 

देता धन दुस-यास

वृद्धी तयात होतसे


होते पूजन राजाचे

त्याच्या फक्त दरबारी

मान तो विद्याधनास

मिळे जगात तो भारी


हेच धन मित्रा सम

गेलो परदेशी जरी

विद्याधन मदतीस

येते हेच खरोखरी


विद्याधन सर्वोकृष्ट

जगतात गाजावाजा

थोर ज्ञानी ज्ञानेश्वर

मान ज्ञानियाचा राजा


Rate this content
Log in