व्हॅलेन्टाइन डे
व्हॅलेन्टाइन डे
लोक प्रेमाला काय समजतात.
मनाला वाटेल तो अर्थ घेतात.
प्रेम,बंधनांत बांधण्याचा विषयच नाही.
अजूनही काही जनांना व्हॅलेन्टाइन डे चा अर्थ कळलाच नाही.
मातेच्या ममतेची सर,
पित्याच्या हृदयाची घरघर.
ज्यांना आजुनही कळलीच नाही.
अजूनही काही जनांना व्हॅलेन्टाइन डे चा अर्थ कळलाच नाही.
बहीणींच्या मायेचा ओलावा,
बंधुभाव आपलेपणा भावाचा.
जगात या नात्याची कोठेही तुलनाच नाही.
अजूनही काही जनांना व्हॅलेन्टाइन डे चा अर्थ कळलाच नाही.
मित्रांच्या मैत्रीचा आधार,
सर्व मित्रांचे हार्दिक आभार.
मैत्रीच्या नात्याची कदर ज्यांना कधी कळलीच नाही.
अजूनही काही जनांना व्हॅलेन्टाइन डे चा अर्थ कळलाच नाही.
व्हॅलेन्टाइन डे म्हणजे,प्रेमी युगुल नाही,
प्रणयाची आरोळी फोडणारी बिगुल नाही.
प्रेम वासने,मोहा पेक्षा वेगळे आहे,
या प्रेमाला उपमाच नाही.
अजूनही काही जनांना व्हॅलेन्टाइन डे चा अर्थ कळलाच नाही.
प्रेमाला रंग नसतो,
प्रेमाला धर्म नसतो.
प्रेमाला नाव नसते,
प्रेमाला भाव नसतो.
प्रेमाची रीत वेगळी,
ज्यांना ती कळलीच नाही.
अजूनही काही जनांना व्हॅलेन्टाइन डे चा अर्थ कळलाच नाही.
प्रेम फक्त प्रेमच असतं,
प्रेम प्रवाह भावनेचा.
प्रेम सुगंध फुलांचा,
प्रेम ॠणांबंध मानांचा.
धागा आहे हा रेशमी,
डोर कधी ही तुटणारच नाही.
अजूनही काही जनांना व्हॅलेन्टाइन डे चा अर्थ कळलाच नाही.
प्रेम,प्रेम,प्रेम सर्व काही प्रेमच आहे.
निसर्ग,विश्व, धर्म, कर्म सर्व काही प्रेमच आहे.
सर्व समीलीत, सर्व समान, प्रेमाला भेदभाव कधी कळलाच नाही.
अजूनही काही जनांना व्हॅलेन्टाइन डे चा अर्थ कळलाच नाही.