वेळ
वेळ
1 min
6
अडकून रहायच तर अवश्य रहा
वेळ मात्र थांबणार नाही
निर्णय घ्यावा लागेलच कधीतरी
पण संधी मात्र उरणार नाही
आजचे लोटले जाईल हर्षाने प्रत्येकदा
पण उद्या मात्र निघणार नाही
अवश्य धुंदीत जगता येईल
पसंती मात्र दर्शवता येणार नाही
अवाढव्य आहे हा हव्यास
पण तहान मात्र भागणार नाही
सुख घेता येईल उसणे मागून
तरीही समाधान मात्र लाभणार नाही
मजेदार वाटेल हसणं आतापर्यंतच
पण सोयीस्कर मात्र ठरणार नाही
वेळ अनमोल या जगात निघून गेल्यावर
मात्र फायदेशीर काही राहणार नाही...