वाढदिवस
वाढदिवस
लाभले हे भाग्य बाई, माझ्या जीवनाला
कुबेराचे धन मज हे, मातृत्व लाभ झाला।।धृ।।
आनंद गगनात मावेना मावेना
शिवबा, संभाजी स्मरत ठेवले, नाव शौर्यशील
किर्तीवंत होत, हो तू समाजात कार्यशील
आशीर्वाद तुला सदैव, यशाचे शिखर चढशील।।१।।
लाभले हे भाग्य बाई, माझ्या जीवनाला
कुबेराचे धन मज हे, मातृत्व लाभ झाला।।ध्रु।।
संकटे कितीही आली डगमगू नको रे
तव किर्तीचा अभिमान मिरवू नको रे
स्वप्न साकारण्यास त्यास बळ दे रे देवा
तुझा वरदहस्त ठेव, करून घे रे सेवा।।२।।
लाभले हे भाग्य बाई, माझ्या जीवनाला
कुबेराचे धन मज हे, मातृत्व लाभ झाला।।ध्रु।।
तुझ्या वाढदिवसासाठी नक्षत्रांचा आसमंत उतरला
उदंड आयुष्य लाभो गाणे गात तुजला
उज्ज्वल भविष्याचे पंख घेत तू बहरला
तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध मनामनात पसरला।।३।।
लाभले हे भाग्य बाई, माझ्या जीवनाला
कुबेराचे धन मज हे, मातृत्व लाभ झाला।।धृ।।