उठ करण्या संघर्ष...
उठ करण्या संघर्ष...
1 min
354
जगू नका पशूसम
उठ.…करण्या संघर्ष ।
हिम्मतीच्या बळावर
शक्य जगणे सहर्ष ।।
हाती लेखणी असून
काय करतो आहेस? ।
अत्याचार होतानाही
फक्त बघतो आहेस ।।
नको बनूस मानवा
डोळे असून आंधळा ।
तुझ्या बांधवांना नको
पाहू देऊ अवकळा ।।
तुझा माझा रक्त लाल
मग भेद कसाकाय? ।
कोण म्हणतो शाळेत
नाही ठेवायचे पाय? ।।
हक्क सगळ्यांना आहे
शिकण्याचा, जगण्याचा ।
मनसोक्त पटांगणी
मित्रांसवे खेळण्याचा ।।
जमणार एकवेळ
पंगू तनाने असता ।
पण जमणार नाही
कधी मनाने असता ।।
