STORYMIRROR

Pawan Raut

Others

4  

Pawan Raut

Others

तू

तू

1 min
27.1K


फाटलेल्या अभाळा आग मातीची विझव् तू

आज पुन्हा तुझे रणांगण नव्याने गाजव तू


कर मोकळा श्वास कुशीत फसलेला

जागवं त्या शेतकऱ्यास जो तुझी वाट पाहत मन मारून बसलेला


दे स्वप्नास त्याचा नव्या पालविचा जोड तू ,

दुःख थोडे सारून सुखं त्याचा पदरी सोड तू ।


जळत्या मनावर त्याच्या आनंदाची शिंपड घाल तू

त्याच्या पाउलावर पाऊल टाकुणी चाल तू


पेटलेल्या सारणारवरूनी आशेची वेळ पुन्हा उगव तू

तुझ्याच शेतकऱ्याला जगव तू


अडचणींवर मात करायला शिकव तू

माझ्या शेतकऱ्याचं रान पुन्हा पिकव तू ।


Rate this content
Log in