STORYMIRROR

Manisha Joshi

Others

3  

Manisha Joshi

Others

तुझे सारे उन्हाळे

तुझे सारे उन्हाळे

1 min
299

तुझे सारे उन्हाळे

संपून जावेत

शिवार तुझे हिरवेगार व्हावे

तुझ्या हातांना थोडी उसंत मिळावी

तुझ्या कष्टाची आता तरी जीत व्हावी

तू पिकवलेले धान्य जणू टपोरे मोती

आज त्यांनाही त्यांची किंमत मिळावी

तुझे सारे उन्हाळे, आयुष्यभराचे

घास येताच हाती 

बळीराजा आम्ही , तुलाच स्मरावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन