तुच तुझा रे
तुच तुझा रे
1 min
11.9K
तु शोध घे तुझा,
हेच तुझे कर्म,
तुच तुझ्यासाठी,
जीवनाचे मर्म.
सांगेल कोणी हे,
ते शक्यच नाही.
तुझ्याच शिवाय,
नाही, काहीचही...
शोधावे स्वतःला,
स्वतः मधेच रे.
सोड निराशाही,
का शोधी आसरे.
लपला तुझ्यात,
तो तु शोध मना.
हा जन्म भुवरी,
येणार ना पुन्हा.
तु रे एकटच,
कोणी ना दुसरे.
तुझ्या शिवायच,
तुच रे तुझा रे.
सोड निराशाही,
टाकुन दे कात.
कर तु प्रवेश,
नव जीवनात.
आज एकटा तु,
भीती हि कसली.
आलास एकटा,
हि वाट एकली.
सोडुन जगाची,
चिंता तु उठ रे.
तुच होशील ना,
तुझा नायक रे
