तृतीय पंथीयांचे दुःख
तृतीय पंथीयांचे दुःख
1 min
353
काय आमचा गुन्हा आहे
कोणी सांगाल का जरा
असा माणसा माणसात
भेदभाव आहे का बरा।।
तृतीयपंथी आहे म्हणून
किती करता हेटाळणी
निंदा आणि नालस्ती ने
केली आम्हा वेटाळणी।।
कोणीच देत नाही आम्हा
करण्यासाठी काही काम
पोट भरण्यासाठी सांगा
कसे कमवावेत आम्ही दाम।।
सकाळी मुख पाहीले की
दिवस जातो तुमचा वाईट
आम्हा छक्के म्हणणाऱ्याना
करणार का कोणी राईट।।
हे सर्व काही करून सहन
आम्ही तर कसेतरी जगतो
हसावे आम्हा वाटत नाही
तरीपण दुःख लपवून हसतो।।
आम्हा तृतीयपंथीयांना पण
माणसासारखे येईल जगता?
एक माणूस म्हणून तुम्ही सारे
आमच्याकडे खरोखर बघता?।।
