STORYMIRROR

Dhanashri Ghanekar

Others

3  

Dhanashri Ghanekar

Others

तो मला असा हवा

तो मला असा हवा

1 min
168

असो शहरातला किंवा गावातला

पोरगा मला आगरी - कोळी हवा...

घेऊन जाईल मला तो लोणावळा

त्या कार्ल्याच्या डोंगराला...


असो शहरातला किंवा गावातला

पोरगा मला आगरी - कोळी हवा...

माझ्या आईचं दर्शन घडवील

माझ्या आईच्या देऊळान न्हेईल...


असो शहरातला किंवा गावातला

पोरगा मला आगरी - कोळी हवा...

समुद्राची सफर तर मला रोजच घडवील

लाटांसोबत घट्ट मैत्री करवील...


असो शहरातला किंवा गावातला

पोरगा मला आगरी - कोळी हवा...

माझ्यावर जीव तो ओवाळील , 

माझ्या मनाचा विचार करील , 

Respect मला तो पुर्ण देईल...


असो शहरातला किंवा गावातला

पोरगा मला आगरी - कोळी हवा...

माझ्या स्वप्नांना पंख देईल 

मोकळ्या आभाळात उडाण करायला शिकवील...


असो शहरातला किंवा गावातला

पण पोरगा मला आगरी कोळी समाजाचाच हवा....


Rate this content
Log in