साधी भोळी माझी आई....
साधी भोळी माझी आई....
1 min
36
साधी भोळी माझी आई प्रेम माझ्यावर करी
जीव ओवाळून टाके ती तिच्या या लेकरावरी...
राहते कधी स्वतः उपाशी पण लेकरासाठी ठेवे पोळीभाजी
अशी माय माझी माऊली सदैव पाठीशी उभी...
लेकरांची पहिली गुरु घरामध्ये शाळा सुरू
आई माझी कल्पतरू शिकवते प्रेम करू...
