STORYMIRROR

Dhanashri Ghanekar

Others

3  

Dhanashri Ghanekar

Others

लग्नाची घाई...

लग्नाची घाई...

1 min
154

माझ्या लग्नाची सर्वांना घाई 

पण पोर मला पसंत नाही...

ही फॅशन वाली मला हवी साधी भोळी

ही बॉबकट वाली मला हवी लांब सडक केसावाली...


माझ्या लग्नाची सर्वांना घाई

पण पोर मला पसंत नाही...

हिच्या डोळ्यांना गॉगलची जाळी 

ही गावभर फिरते मॉडेल वांनी...


माझ्या लग्नाची सर्वांना घाई

पण पोर मला पसंत नाही...

ना हिच्या केसात गजरा, ना कानात झुमके

ना पायात पैंजण ही घाली...

एका पायात नुस्ता काळा धागा गुंडाळते ही बाई...


माझ्या लग्नाची सर्वांना घाई

पण पोर मला पसंत नाही...

ही पोर मला पसंत नाही....


Rate this content
Log in