साडी...
साडी...
1 min
192
नेसली नऊवारी ती फेवरेट वाली
नाकात नथ घालून सजली ती कोवळी कळी...
गळ्यात थुशी ती शोभून दिसते कशी
हिरव्या चुड्यांनी हातांची शोभा वाढतेय तशी...
कानातील झुमके नजरा टिपऊन घेती
पायातील पैंजण काय रूणुझुणू वाजती...
यौवन कसे खुळते साडीत शोभून दिसते
केसांमध्ये वेणी किती सुंदर वाटते...
माथी चंद्रकोर अगदी उठून दिसते
मराठी मुलगी त्यात वाघीण दिसते...
