थवा पाखरांचा
थवा पाखरांचा
1 min
12.1K
पहा थवा पाखरांचा,
पाखरांचा ऐका चिवचिवाट.
चिवचिवाट कर्णमधुर,
कर्णमधुर स्वरांनी झाली पहाट.
पहाट नव चैतन्याची,
चैतन्याची उर्जा महान.
महान सुखद सुन्दर,
सुंदर वातावरण छान.
छान मंजुळ गीते पाखरांची,
पाखरांची मंजुळ भाषा.
भाषा मन मुग्ध करणारी,
करणारी पूर्ण अभिलाषा.
