Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shakil Jafari

Others

3  

Shakil Jafari

Others

थँक्स कोरोना (2)

थँक्स कोरोना (2)

1 min
11.9K


आम्ही घेऊ लागलो

काळजी

रस्त्यांवर न थुंकण्याची

आणि

रुमाल तोंडाला लावून

शिंकण्याची,

आम्ही शिकू लागलो

आताशी

हात

स्वच्छ धुण्याची

पद्धत,

घर अंगण

स्वच्छ ठेवण्याचा

पाठ,

आम्ही करू लागलो

औषधांची फवारणी

पसरू नये रोगराई

म्हणून

गावा गावात

आणि

शहर शहरात,

आम्ही शिकू लागलो

आत्ताशी

या विज्ञान युगात ही

आत्मसात न केलेले

स्वच्छतेचे धडे

हे सगळं

तुझ्यामुळेच

शक्य झाल,

हे चमत्कार

तुझ्यामुळेच

घडलं

म्हणून

थँक्स कोरोना...


Rate this content
Log in