स्वर्ण मृग
स्वर्ण मृग
1 min
280
दिसतो कसा
छान गोंडस ।
सुंदर असा
रम्य पाडस ।।1।।
फिरतो कसा
तो जंगलात ।
पाने झाडांची
हिरवी खात ।।2।।
टुणूक टुणू
मारतो उड्या ।
नका दाखवू
त्यास काड्या ।।3।।
श्वेत ठिपके
सोनेरी केस ।
दोन शिंगरे
दिसे विशेष ।।4।।
इवले कान
सुंदर डोळे ।
पाहुनी आम्हा
आनंद मिळे ।।5।।
म्हणूनी डोळे
स्त्रीचे पाहुनी ।
म्हणती तिला
मृग - नयनी ।।6।।
रुप मृगाचे
पाहुनी सिता ।
आणुनी द्या ते
म्हणे श्रीनाथा ।।7।।
मृग चपळ
आहे लक्षण ।
पण वाघाचा
होई भक्षण ।।8।।
