स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिन
1 min
334
स्वातंत्र्य दिन आमुचा आज
खूपखुप शुभेच्छा
चकाकावं प्रत्येकानं
मनोमन हिच इच्छा
दैदिप्यमान पराक्रम घडावा
वैभवशाली व्हावी धरणी
विश्ववंदनीय आपली
भारतीय विचारसरणी
महान थोर क्रांतिकारकांच्या चरणी
वंदन कोटी कोटी
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो
हेच शब्द प्रत्येक ओठी
जय जवान जय किसान
धरू विज्ञानाची कास
प्रत्येक भारतीयांचा किर्तीवंत होवो
ध्येयवेडा प्रवास
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो
अखिल मानवजातीला अभिमान
जय जय भारत जय जय भारत
सर्व जगाची शान
