सुस्मित काव्य
सुस्मित काव्य
1 min
107
सांज झाली, दिवस ढळता आले अंधारुनी
येईल दिनकर उद्या सकाळी उजाडुनी
शेतात शेतकरी घाम गाळुनी कष्ट करी
म्हणूनच अमुची ही कोठारे जाई भरुनी
जो छडी वाजे छम छम करुनी विद्या घेई
तोच विद्यार्थी पुढे जाई नामवंत होऊनी
भाकरी भाजताना चटके लागती हाताला
मुले मौजेनेे खाताना आनंद वाटे पाहुनी
दिवस रात्र दोघे कष्ट उपसत राहिले
म्हणूनच हे सूख आले ते दिवस जाणुनी
अख्या जगाने लाथाडले तिला गरीबीमुळे
पण प्रेमाच्या धाग्याने तिने घेतले जोडुनी
