STORYMIRROR

Mala Malsamindr

Others

4  

Mala Malsamindr

Others

सुरक्षिततेसाठी हत्यार

सुरक्षिततेसाठी हत्यार

1 min
591

आई तुला बनवायचे तर मला नीडर का नाही बनवलं

नाहीतर मला तुझ्या उदरातच मारून का नाही टाकलं 

एवढे मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं 

शिकून-सवरून मला एवढ डॉक्टर बनवलं 

सुरक्षितेसाठी माझ्या तु मला एखादं हत्यार का नाही दिलं

शेतात काम करून घाम - गाळून गाळून मला शिकवलं शिकून-सवरून मला प्राध्यापिका तू बनवलं 

माद्रया सूरक्षेसाठी तू मला एखादं हत्यार का नाही दिलं

तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं 

ज्ञान शिकवून मला सिस्टर तू बनवलं 

मग माझ्या सुरक्षेसाठी एखादं हत्यार का नाही मला दिलं

मजुरी करून करून मला तू शाळेत आई पाठवलं

शिकून-सवरून मोठे बनावं यासाठी शिकवलं 

मग तू मला एखादं सुरक्षिततेसाठी हत्यार का नाही दिलं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन