Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mala Malsamindr

Others

3  

Mala Malsamindr

Others

सुरक्षिततेसाठी हत्यार

सुरक्षिततेसाठी हत्यार

1 min
194


आई तुला बनवायचे तर मला निडर का नाही बनवलं

नाहीतर मला तुझ्या उदरातच मारून का नाही टाकलं 

एवढे मला तळहाताच्या फोडाप्रमाणे तू जपलं 

शिकून-सवरून मला एवढं डॉक्टर तू बनवलं 

मग सुरक्षितेसाठी तू मला एखादं हत्यार का नाही दिलं


शेतात काम करून घाम गाळून-गाळून मला शिकवलं

एवढे शिकून-सवरून मला प्राध्यापिका तू बनवलं 

सुरक्षेसाठी माझ्या मला एखादं हत्यार का नाही दिलं


लाड पुरवून तळहाताच्या फोडाप्रमाणे मला तू जपलं 

खूप - खूप ज्ञान शिकवून मला सिस्टर तू बनवलं 

मग माझ्या सुरक्षेसाठी एखादं हत्यार का नाही मला दिलं


मजुरी करून करून मला तू शाळेत आई पाठवलं

शिकून - सवरून मोठे बनावं यासाठी तू शिकवलं 

मग तू मला एखादं सुरक्षिततेसाठी हत्यार का नाही दिलं


Rate this content
Log in