STORYMIRROR

Hareshkumar Khaire

Others

3  

Hareshkumar Khaire

Others

सुंदर

सुंदर

1 min
633


सुंदर...


जग हे सुंदर जग हे सुंदर

जग हे सुंदर करू या रे ।धृ।


चंद्र सुंदर सूर्य सुंदर

प्रकाश सुंदर देवू या रे ।१।


नदी सुंदर नाले सुंदर

पाणी सुंदर ठेवू या रे ।२।


झाडे सुंदर झुडपे सुंदर

निसर्ग सुंदर राखू या रे ।३।


घर सुंदर रस्ते सुंदर

गाव सुंदर करू या रे ।४।


आचार सुंदर वर्तन सुंदर

विचार सुंदर ठेवू या रे ।५।


आई सुंदर वडील सुंदर

नाते सुंदर ठेवू या रे ।६।


Rate this content
Log in