STORYMIRROR

SHUBHAM GHUDE

Others

4  

SHUBHAM GHUDE

Others

स्त्रीचं जीवन

स्त्रीचं जीवन

1 min
530

स्त्री असताना सर्व जगात जनतेचं राज्य आहे,

त्यामुळेच खरंच जगामध्ये स्वराज्याच्या राजमाता जिजाऊंचं नाव आहे


स्त्री असताना सर्व जगात सुशिक्षितपणा आहे,

त्यामुळे खरंच जगामध्ये ज्ञान प्रज्ज्वलित सावित्रीबाईंच नाव आहे


स्त्री असताना सर्व जगात सुखरूप सावळी आहे,

त्यामुळेच खरंच जगामध्ये हिरकणी बुरुजाचे नाव आहे


स्त्री असताना सर्व जगात त्याग आहे,

त्यामुळे खरंच जगामध्ये स्वराज्याच्या महाराणी येसूबाई यांचे नाव आहे


स्त्री असताना सर्व जगात ममता-माया आहे,

त्यामुळेच खरंच जगामध्ये स्वराज्याच्या लेकीचं राणूबाईचं नाव आहे


स्त्री असताना सर्व जगात सुसंस्कृतपणा आहे,

त्यामुळेच खरंच जगामध्ये संत मुक्ताई यांचं नाव आहे


स्त्री हसताना सर्व जगात आकाशापेक्षा उंच झेप आहे,

त्यामुळेच खरे जगामध्ये अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव आहे


Rate this content
Log in