जाणता राजा
जाणता राजा
1 min
212
साऱ्या जगात नाव गाजतंय, छत्रपती शिवाजी राजा,
गर्वाने मावळे बोलती, जय शिवाजी- जय भवानी.
सह्याद्रीच्या कणकणात, मावळे तयार केले,
शत्रुंशी गनिमीकाव्याने लढता, छत्रपती शिवाजी राजा.
सुन ती सुभेदाराची, पाठवी परत सन्मानाने,
परस्त्री माते समान पुजिता, छत्रपती शिवाजी राजा.
स्थापन करून रयतेच, न्याय हक्काच राज्य,
सर्व जगात शोभून दिसे, छत्रपती शिवाजी राजा.
उगवून सोन्याचं पीक, शोभून दिसे रयतेच राज्य,
समान वागणूक देऊन आदर्श घालतो जगास, छत्रपती शिवाजी राजा.
