STORYMIRROR

SHUBHAM GHUDE

Others

3  

SHUBHAM GHUDE

Others

दास्यभक्तीचा महिमा

दास्यभक्तीचा महिमा

1 min
290

जन्मासी आलोय भुमीवरती, जन्ममृत्यूच्या फेर्‍यात,

चुकवेन चौऱ्याऐंशीचा फेरा, करुणी संतांची दास्यभक्ती.

मन माझ हरवून जात, घेता नाम भगवंताचे,

चुकवेन चौऱ्याऐंशीचा फेरा, करुणी संतांची दास्यभक्ती.

काय चालते विषयांचे सोंंग, तुज समोर भगवंता,

चुकवेन चौऱ्याऐंशीचा फेरा, करुणी संतांची दास्यभक्ती.

या वेड्या मनास लागली, गोडी त्या अमृताची,

चुकवेन चौऱ्याऐंशीचा फेरा, करुणी संतांची दास्यभक्ती.

काय वर्णू तुझी लीला, तू सृष्टीचा कर्ता करविता,

चुकवेन चौऱ्याऐंशीचा फेरा, करुणी संतांची दास्यभक्ती.

संत नामदेव रचिला पाया, संत तुका झालासी कळस,

चुकवेन चौऱ्याऐंशीचा फेरा, करुणी संतांची दास्यभक्ती.

चौऱ्याऐंशीचा फेराः पाप-पुण्य समान ,असा मनुष्य देह.

Rate this content
Log in