STORYMIRROR

SHUBHAM GHUDE

Others

4  

SHUBHAM GHUDE

Others

शाळेतील दिवस

शाळेतील दिवस

1 min
1.2K

शाळेमध्ये असताना असं वाटायचं,

कधी हे सर्व दिवस संपून जातील,

पण आता आयुष्य जगत असताना,

असं वाटतं ते दिवस परत यावे.


शाळेमध्ये असताना सर्व काही समजत नव्हतं,

पण खरच आयुष्य प्रामाणिक प्रमाणे जगत होतो,

पण आता आयुष्य जगत असताना,

असं वाटतं ते दिवस परत यावे.


शाळेमध्ये मित्र-मैत्रिणी सोबत खूप भांडायचो,

पण ते जग फारच सुंदर होत,

पण आता आयुष्य जगत असताना,

असं वाटतं ते दिवस परत यावे.


शाळेमध्ये गुरुजी खऱ्या अर्थाने आयुष्य सांगायचे,

पण आम्हा वेडयांना मात्र ते कधी समजलंच नाही,

पण आता आयुष्य जगत असताना,

असं वाटतं ते दिवस परत यावे.


Rate this content
Log in