SHUBHAM GHUDE

Others

4.0  

SHUBHAM GHUDE

Others

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
11.8K


काय झाले असे अचानक जीवनामध्ये,

मन अंतःकरणामध्ये दंग होऊन गेले,

पाहता तुझं रूप ते समोर गोजिरवाणे,

नयना माझे हरवून गेले..


पाहता तुज हृदय माझे भारावून जाते,

काय आहे अशी जादू तुझ्यामध्ये,

पाहता तुज हे मन वेडावून जाते,

सांग काय अशी भ्रांती तुझ्या नयनांमध्ये ..


रोज आस असे तुझं प्रेमळ रुप पाहण्याची,

पण काय असं घडतं ते समजतच नव्हतं,

असा काय खेळ मांडला होता तो नियतीने,

ते कोड कधी संपणारच नव्हतं...


अचानक परत तु समोर आलीस,

मन माझं तुझ्यात हरवून गेलं,

पण काहीच न बोलताच निघून गेलीस,

ते मात्र हृदयाला टोचून गेलं....


Rate this content
Log in