STORYMIRROR

SHUBHAM GHUDE

Others

3  

SHUBHAM GHUDE

Others

सध्याची परिस्थिती

सध्याची परिस्थिती

1 min
173

जगाच्या प्रत्येक भागात आत्याचार, अंधकार पसरत होता,

त्यावेळी धर्माचा रक्षण करणारा, कोणी शिल्लकच नव्हत,

अशा भयंकर परिस्थितीत, महाराष्ट्रात एक रत्न अवतरले,

खऱ्या अर्थाने त्या दिवशी, जगामध्ये खरी पहाट झाली.


सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये एक वेगळेच वातावरण पसरलं,

महाभाग्यवान अशा राजमाता जिजाऊंच स्वप्ना अवतरलं,

शिवनेरीला पावन करत शिवाजी राजांचा अवतारप्रकटला

दाही दिशांना एक वेगळेच वातावरण निर्माण झालं.


अवघ्या थोड्याच जिवलगासह स्वराज्य निर्मितीचा प्रण केला,

जिजाऊ मातेची शिकवण होती, शिवबा गनिमीकावा सर्वश्रेष्ठ,

लाखोंचं बळ समोर असताना, जनतेचं राज्य उभारलं,

हाच तो माझ्या राजांचा लढाऊ महाराष्ट्र राज्य, भारत देश.


आज तीच स्थिती पुन्हा, आपल्या भारत देशावर आली आहे,

पण फरक एवढाच आहे, शत्रु आता दिसत नाही,

ही लढाई आपल्याला महाराजांच्या गनिमीकाव्यानेच जिंकायची आहे,

म्हणजे सध्याच्या परिस्थितीत, सोशल डिस्टन्स


आपण तेच मावळे आहोत, आपण हे युद्ध जिंकणारच,

फक्त सर्वांनी प्रत्येक मावळा सारखं एकनिष्ठ योगदान द्या,

आपल्या भारत देशाचे मस्तक सर्व जगात,

पुन्हा एकदा अभिमानाने उंच करू या, करणारच


Rate this content
Log in