स्त्री एक प्रेरणा
स्त्री एक प्रेरणा
1 min
238
निर्मिती केली देवाने
स्त्री एक प्रेरणा
नाजूक कोमल कांती
वात्सल्य सिंधू तारणा.
स्त्री एक पण रुपे अनेक
प्रत्येक रुपात दाखवी चमक
कार्य करे ती सतत
तिच्यातअसे मोठी धमक.
नवरुपांची ती नवदुर्गा
वेळ येताच दाखवी स्वरूप
नाही जगी कोणी तिच्याहून श्रेष्ठ
माया ममतेत तीच एक अनुरूप.
बाळकडू पाजी ती मुलांना
संस्कार बीज रुजवे नसात
सदा पाहे हीत कुटुंबाचे
आदर्श दिसे तिच्या संसारात.
नारी एक महान प्रेरणा
जगाच्या पाठीवर पहा सर्वांना
निगा काळजी घेई ती एकमेव
आदर्श घालुनी देई सर्व लोकांना.
