STORYMIRROR

Deepali Mathane

Others Children

4  

Deepali Mathane

Others Children

सोनकळी....

सोनकळी....

1 min
269

सोनपावली अलगद उमलली जीवनी सोनकळी

नयन निरागस बोलके हसता गाली गोड खळी

   पितृत्वाची जाण तू माझ्या जाणीव जबाबदारीची

   तव मऊ कोमल स्पर्शाने मनी जागल्या पितृभावनेची

तुझे गोंडस खट्याळ चाळे कसे लाडके विसरेन मी

एक-एक आठवण तुझी बालरूपातील आठवेन मी

   बोबड्या बोलाची तू निरागस गोंडस कळी

   लावण्याचे अनुपम असे तेज तुझे झळाळी

 तुझ्या कोवळ्या पदस्पर्शाने माझी जीवनबागच फुलली

तुझ्या खळाळून हसण्याने बंद कळीही खुलली


Rate this content
Log in